Job 12

1नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,

2“तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल.
3माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासहि माहित नाहीत?

4माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्याला त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात.

5जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे.
6परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत:चे हातच त्यांचे देव आहेत.

7पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हाला सांगतील.

8किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि,

9या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे.

10जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.

11ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का

12वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.

13देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.

14देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
15पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.

16त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत.

17तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो.
18तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो.

19तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.

20तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो.
21तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो.

22तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.

23तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांना नष्ट करतो.

24देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.

प्रकाशविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या माणसा सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.”
25

Copyright information for MarULB